हे पान प्रमाणित केलेले आहे.
६
त्रिगुण गुण बाई । पूर्ण उजळल्या वाती ।
नवलाव अविनाश । न जाये स्वयंज्योती ।
लावितां लक्ष तेथें । हालूं विसरलीं पातीं ।
नातुडे मन माझें । न कळे दिवसराती ॥३॥
आरती विठ्ठलाची । पूर्ण उजळली अंतरीं ।
प्रकाश थोर झाला । सांठवेना अंबरीं ।
रविशशि मावळले । तया तेजामाझारीं ।
वाजतीं दिव्यवाद्ये । अनहत गजरीं ॥४॥
आनंदसागरांत । प्रेमें बुडी दिधली ।
लाधलें सौख्य मोठें । नये बोलतां बोलीं
सद्गुरूचेनि संगें । ऐसी आरती केली ।
निवृत्ति आनंदांत । तेथें वृत्ति निमाली ॥५॥
विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल,!!!
पुंडलीक वरदा हरि विठ्ठल !!
🙛🙛🙛🙛🙛🙛