Jump to content

पान:नित्यनेमावली.pdf/४१

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

गुरु हा भक्तीचें मंडण | गुरु हा देहासी दंडण |
गुरु हा पापाचें खंडण | नानापरी वारितसे ॥४॥

गुरु हा वैराग्याचें मूळ | गुरु हा परब्रह्म केवळ ।
गुरु हा सोडवी तात्काळ । गांठी लिगदेहाच्या ॥५॥

गुरु हा घाली ज्ञानांजन | गुरु हा दाखवी निजधन ।
गुरु हा सौभाग्य देऊन | स्वात्मबोध नांदवी ॥६॥

काया काशी गुरु उपदेशी । तारक मंत्र दिला आम्हांसी ।
बापरखुमादेवीवरासी । ध्यान मानसीं लागलें ॥७॥

(५)

फळलें भाग्य माझें । धन्य झालों संसारीं ।
सद्गुरु भेटले हो । त्यानीं धरियेलें करीं ।
पश्चिमे चालवीलें । आत्मा तेथें निर्धारी ।
त्रिकुटावरी नांदे | देखियेली पंढरी ॥ १॥

तें सुख काय सांगूं । वाचें बोलता नये ।
आरतीचेनि योगें । गेलें मीपण माये ॥ धृ०॥

राउळामाजीं जातां । राहे देह-अवस्था |
मन हें उन्मन झालें । नसे बद्धतेची वार्ता ।
हेंतु हा मावळला | शब्दा आली निःशब्द्वता |
तटस्थ होउनि ठेलें । निजरूप पाहतां ॥२॥