पान:नित्यनेमावली.pdf/३३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

दहाव्या आवृत्तीची प्रस्तावना " ज्येष्ठ शुद्ध दशमी शके १८७९ ( दि. ६-६-१९५७ ) रोजी श्रीगुरुदेव रानडे यानी निंबाळ येथे देह ठेविला. त्यांचे एक ओवीबद्ध अल्पचरित्र रा. रा. मनोहरपंत देशपांडे यानी रचलेले " श्री गुरुदेववचनामृतसार " हा सातवा समास म्हणून घालून या पुस्तकाची आठवी आवृत्ति श्री गणपति संस्थान प्रेसमधेच छापवून, १९६० साली प्रसिद्ध करण्यांत आली. तदनंतर याची नववी आवृत्ति पचसमासीतील कांही भाग कमी करुन व इतर कांहीं पदे वगैरे जास्त घालून, १९७६ साली श्रीमति चंद्रकलाबाई हाटे मुंबई यांच्या सहकार्याने प्रसिद्ध करण्यांत आली आणि त्यांच्या इच्छेनुसार त्याच्या प्रति साधकाना विनामूल्य भेट म्हणून देण्यांत आल्या. नित्यनेमावलीची दहावी आवृत्ति श्रीगुरुदेवानी स्थापन केलेल्या " अँकॅडेमी ऑफ कंपरेटिव्ह फिलॉसोफी अँड रिलिजन् बेळगांव " या संस्थेच्या सहकार्याने माघ शुद्ध ३ शके. १९०० (ता. ३०-१-१९७९ ) रोजी प्रसिद्ध झालो. या आवृत्तीमध्ये काकड आरती व त्रिकाळ भजन या शिवाय पुढील मजकुराचा समावेश करण्यांत आला आहे :- (१) श्रीभाऊ साहेब महाराज असताना प्रसिद्ध करण्यांत आलेले 'पंचसमासी" हे प्रकार जसेच्या तसें संपूर्ण यांत दिले असून, त्याबरोबर श्री अंबुराव महाराज व श्रीगुरुदेव रानडे यांची ओबीबद्ध अल्पचरित्रेंही देण्यात आली आहेत. (२) श्री शिवलिंगव्वा बाक्का यांची काही पदे