RD 17 २८ आरत्या व पाळणा यांचाही समावेश यांत केला आहे. (३) सप्ताहाचे प्रसंगी सकाळी ( ज्ञानेश्वरी, दासबोध इत्यादि ) पोथीचे वाचन सुरू करण्यापूर्वी प्रारंभी पठण करण्यांत येणारे “नारायणस्तोत्र व निर्वाणषट्क" ही दोन्ही प्रकारणे साधकांच्या माहितीसाठी व सोयीसाठी यांत दिली आहेत. (४) दासबोधांतील नामस्मरण भक्ति व सख्य भक्ति " हे दोन्ही समास साधकांच्या दृष्टीने विशेष उपयुक्त म्हणून मानले गेले असल्याने त्यांचा, तसेंच "मनाचे श्लोक " पहिले दहा, यांचाही समावेश यांत केला आहे. (५) या नित्यनेमावलीची पहिली आवृत्ति तयार होण्यापूर्वी, चिमड मठातील ती 'पांच पदे' इंचगेरी येथील मठांत म्हटली जात असत ती पदेही श्रीगुरुदेवांच्या इच्छेनुरूप साधकांच्या माहितीसाठी या आवृत्तीत समाविष्ट केली आहेत. (६) याशिवाय काही नवीन आरत्या, पदे वगैरेही यांत दिली आहेत. • याप्रमाणें साधकाना अनेक दृष्टीनी उपयुक्त अशी नित्यनेमा- वलीची दहावी, अकरावी व ही बारावी आवृत्ति श्रीसमर्थ कृपेनें व या ॲकॅडमीच्या सहकार्याने साधकांच्या हाती देण्याचा सुप्रसंग लाभल्याने आनंद होत आहे. बेळगांव: माघ कृष्ण २, शके १९०८ (तारीख १५-२-१९८७) प्रकाशक
पान:नित्यनेमावली.pdf/३४
Appearance