पान:नित्यनेमावली.pdf/३२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२६ आठव्या आवृत्तीची प्रस्तावना. · नित्यनेमावलीच्या या आठव्या आवृत्तींत खालील नवीन मजकूर घातला आहे, तो वाचकांना उपयुक्त वाटेल यांत शंक नाहीं. (१) कांहीं नवीन आरत्या ( आरती क्रमांक १२ ते १६ ) ( २ ) या नेमावलीची पहिली आवृत्ती तयार होण्यापूर्वी इंचगेरी मठांत चिमडमठांतील पांच पधें म्हटली जात असत; तो पांच पद्येहीं नेमावलोंत अंतर्भूत व्हावीत अशी इच्छा श्रीगुरुदेवांनीं प्रदर्शित केली होती. (६) श्रीअंबूरावमहाराजांच्या चरित्राचा नवीन समास घातल्यावर पूर्वीच्या "पंचसमासी" ची षट्समासी पांचव्या आवृत्तींत आली. या आवृत्तींत श्रीगुरुदेवांच्या चरित्राचा श्री. मनोहरपंत देशपांडे यांनी रचलेला समास अंतर्भूत केला आहे. आतां ही सप्तसमासी पूर्ण झाली. या आवृत्तीच्या छपाईचें काम श्रीगणपति संस्थान प्रेसनें काळजीपूर्वक करून दिले त्याबद्दल व्यवस्थापकांचे व कामगारांचे आभार मानणें अवश्य आहे. माघ शुद्ध ३ शके १८८२ प्रकाशक.