पान:नित्यनेमावली.pdf/३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२५ सातव्या आवृत्तीची प्रस्तावना - नित्यनेमावलीची पहिली आवृत्ती श्रीसमर्थ भाऊसाहेब - महाराज असतानाच रा. रा. विष्णुपंत फडके यानी १९११ सालीं प्रसिद्ध केली. त्यानंतर श्रीसमर्थ महाराजांनीं १९१४ मध्ये देह ठेविल्यानंतर तीन वर्षांनी म्हणजे १९१७ सालीं रा. रा. विष्णुपंत फडके यांनींच त्या पुस्तकाची दुसरी आवृत्ती प्रसिद्ध केली. या आवृत्तींत श्रीमहाराजांच्या निर्याणाबद्दलचा अभंग प्रथम छाप- ण्यात आला होता. तो अभंग या आवृत्तींतही पुढे दिलाच आहे. नित्यनेमावलीची तिसरी आवृत्ती रा. रा. शिवलिंगप्पा चिक्कोण यांनी जमखंडी येथे १९२४ सालीं छापविली व चौथी आवृत्ती रा. रा. नीलकंठराव तुळपुळे यांनीं सन १९३० साली पुणे येथे प्रसिद्ध केली. पुढें तीन वर्षांनी श्री अंबुराव महाराजांनी १९३३ च्या डिसेंबरमध्ये देह ठेविला. त्यांचें रा. रा. मनोहरपंत देशपांडे, अथणी यांनी रचलेलें ओवीबद्ध अल्पचरित्र सहावा समास म्हणून, सहाव्या व या आवृत्तींत घातला आहे. 'नित्यनेमावली' अत्यंत अल्प किमतीत साधकांना मिळावी, या उद्देशानें ही आवृत्ती प्रसिद्ध केली जात आहे. श्रीगणपती संस्थान प्रेसकडून संपूर्ण सहकार्य लाभल्यानेंच या स्वस्त आवृतीचें प्रकाशन होत आहे हें कळविण्यास आम्हांस आनंद वाटतो. माघ शु. ३. शके १८७६. . प्रकाशक