पान:नित्यनेमावली.pdf/३०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२४ घेण्याची व्यवस्था केली आहे. जेथें दोन्ही पाठ सारखेच वाटले तेथें सांप्रदायांतीलच ठेविला आहे. भजनाचें हस्तलिखित पुस्तक व पंचसमासी नामक प्रकरण हीं आमचे मित्र रा. पंचनदीकर यांजकडे शुद्धिकरितां प्रथम पाठविलीं होतीं; त्याप्रसंगी त्यांनी केलेले पद शेवटों दिले आहे. तदनंतर ती पुन्हां अमव्या दुसन्या एका गुरुवंचूकडे पाठविण्यात आली, त्यांनीं होतां होईल तो शुद्ध करून तो आम्हांकडे परत पाठविली. प्रस्तावना, पंच- समासी समास २ पैकीं पुष्कळ भाग व पांचव्या समासांतील मुक्तिलक्षण (६७-८१) ही त्यांच्याच हातचीं आहेत. शेवटीं ज्या परमेश्वरानें हैं पुस्तक छापण्याचा सुयोग घडबून आणिला त्याचे चरणींच तें अर्पण करून ही प्रस्तावना पुरी करतो. -प्रकाशक.