तात्यांच्या गाथेत ८/१०००० दिली आहे वर घेतलेल्या शास्त्रीबोवांच्या उताऱ्यावरून व शिवाय आमच्या अभंग २३ वरून ‘चार कोटी एक लक्ष चौतीस हजार' अभंगसंख्या आहे असें दिसतें. महिपतीच्या म्हणण्याप्रमाणें ४ कोटी आणि कांहीं लक्ष संख्या आहे (संतलीलामृत). तुकाराममहाराजांची अभंगसंख्या ठरविण्याच्या दृष्टीने आमच्या भजनांतील अभंग २४ अतिशय महत्त्वाचा आहे; तो जिज्ञासूंनीं अवश्य वाचावा. त्यांत पांच कोटी एक लक्ष चौतीस सहस्र अभंगसंख्या असल्याबद्दल उल्लेख आहे रा. शंकर पांडुरंग पंडित यांनी हा अभंग आपल्या इंदुप्रकाशगाथेत प्रस्तावनेंत दिला आहे. फक्त "तीस लक्ष केली देवांसि करुणा। कर्मकांड जाणा एक लक्ष||" ही ओळ गाळली आहे. ही ओळ गाळूनही त्यांची बेरीज वरील संख्येवर गेली आहे! आतां आमच्या अभंगाप्रमाणें बेरीज करितां पांच कोटी एक लक्ष चौतीस सहस्र बरोबर बेरीज येत आहे:-
१२००० संहिता
१०००० उपग्रंथ ( अवतार सहस्र दशसहस्र )
१००००००० भक्ति
१००००००० ज्ञान
७५००००० वैराग्य
७५००००० नाम