पान:नित्यनेमावली.pdf/२७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२१ हे अभंग तुकाराममहाराजांचेच आहेत अशी लोकांची खात्री व्हावी म्हणून "टाळ आणि कंथा" निशाणीरूपाने त्यांज- बरोबर पाठविण्यांत आल्या. ही निशाणी पाठविण्यांत आली तथापि ते तुकारामहाराजांचेच आहेत किंवा कसें याबद्दल मोठघा लोकांत सुद्धां मतभेद आहेत. अलीकडे निर्णयसागर प्रेस, इंदिरा प्रेस किंवा इंदुप्रकाश प्रेस यांनी छापलेल्या गाथेंत हे अभंग दिलेच नाहींत. ह. भ. प. विष्णुबुवा जोग यांच्या सार्थ गाथेंत क्षेपकांतही हे अभंग दिले नाहींत. हे अभंग स्वतंत्ररूपानें मात्र उपलब्ध आहेत; व पुष्कळ साधुसंतांच्या तोंडी असल्यानें पुष्कळ प्रसिद्ध पावले आहेत. शिवाय तुकारामतात्या यांनी आठ दहा हजार अभंगांची जी तुकारामाची गाया दोन भागांत छापली आहे तींतही हे सापडतात. याखेरीज हे अभंग तुकारामांचेच आहेत असे म्हणण्याबद्दल आणखी एक पुरावा आहे. त्या अभंगांतोल विलक्षण प्रेमळपणा व ओतप्रोत भरलेला स्वानुभव यांचा विचार केला असतां हे अभंग तुकाराम- महाराजांच्या वाणींतूनच बाहेर पडले असावे असें सवळ अनुमान होतें. · अभंगसंख्येबद्दल तरी बरें ! तुकाराममहाराजांच्या लोकांत एकमत कोठे आहे ? हल्लींच्या ज्या नांवाजलेल्या था आहेत त्यांत ४/५००० च अभंगांची संख्या आहे तुकाराम- G -