पान:नित्यनेमावली.pdf/२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२० दिल्यानंतर जो स्थिति प्राप्त होते ती वाचेनें बोलून दाखवितां येत नाहीं, किंवा मनानेंही आकलन करतां येत नाहीं (कांकड- आरती ७). पुढे भजनांत जे तुकारामांचे बारा अभंग दिले आहेत (१०-२१) ते व त्यापुढील २ अमंग हे निंबरगीमहाराजांच्या वेळेपासून या सांप्रदायांत नित्य म्हणण्याची वहिवाट पडली आहे; हेच कोठें "चवदा अभंग" या नांवानें प्रसिद्ध आहेत. विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी म्हटले आहे :- तुकाराम, नामदेव, ज्ञानदेव इत्यादिकांचे अभंगही किती आहेत याचा ठिकाण नाहीं. · चार कोटी एक लक्षाच्या शेवटीं । चवतीस सहस्त्र स्पष्ट सांगितले || सांगुनि इतुकें तुका कथिता झाला | 'चवदा अभंगा' सोडूं नका ।। " याचाच निराळा पाठ आमच्या भजनांत अभंग २३ यांत पहावा. हे बारा अमंग श्रीतुकाराम महाराजांनीं विदेहमुक्ति मिळविल्यावर त्यांची टाळ आणि गोधडी जी खालीं पडली त्या- बरोबर शेवटचा निरोप म्हणून पाठविले आहेत. " टाळ आणि कंथा धाडिली निशाषी घ्या रे ओळखोनि सज्जन हो || माझें दंडवत तुम्हां सर्व लोकां । देहासहित तुका वैकुंठासीं ।। "