पान:नित्यनेमावली.pdf/२५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१९

ज्ञानाचें प्रथम साधन आहे (१८). : अंत:करणति समुद्राप्रमाणे शांति उत्पन्न होऊन जडमूढपिशाचवत् पृथ्वीवर साधु हिडतात, ते लोकांस मूर्खाप्रमाणे भासतात, पण स्वतः ब्रह्मानंदांत मग्न असतात त्यांचें वर्म योग्याखेरीज दुसऱ्यांस कळत नाहीं (१९). लवण जसें समुद्राला मिळून तदाकार होतें, तसेंच साधु ब्रह्मास मिळतात व त्यांचें नामरूपही लयास जातें ( २० ). 'साधन करितां करितां सद्भक्ति उत्पन्न होईल, व सद्भक्तीनें साक्षात्कार. होईल (२१). पदोपदीं श्रीमुख पाहिल्यावर नंतर प्रत्यक्ष पाउलें दिसतील (२२). श्रीविठ्ठल म्हणतात कीं, "हे तुकारामा, तुझ्या अभंगाचें जें प्रेमानें पठण करितात त्यांच्या विपत्ती मी स्वतः हरण करितों," (२५). ज्या गुरूंपाशीं सर्वदा देव आहे त्यांचे चरणीं भाव ठेविला असतां आपल्यास देवाची प्राप्ति सहज होते ( २६ ) . वामसव्य, खालींवर, सबाह्यअभ्यंतरीं सर्वत्र देवाचें दर्शन होतें ( ६९ ). देवाचें दर्शन झाल्यावर आनंदानें त्रिभुवन कोंदाटून जातें (४१). देहामध्येच देव पाहून निर्गुणाच्या ज्योतीनीं त्यांस ओंबाळावें (४८). चंद्रसूर्य हेच तेथें दिव्याचें काम करितात (४९). पांडुरंगाच्या आरतीच्या वेळेस महाद्वारीं सिंहशंखनाद व भेरीगजर होत असतो (कांकडआरती ६). अंतरी आरती चालली असतां त्या प्रकाशांत रविशशि सुद्धां लोपून जातात, व अनाहत वाद्यांचा गजर होतो; व आनंदसागरांत बुडी