पान:नित्यनेमावली.pdf/२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१८

घडि पळ घडोनें काळाचें मात्र सार्थक करावें ; संतप्रमाण आत्मज्योत सहज प्रतीतीस येते ( वि. नं ३) अहंकारावर स्वार होऊन त्याचा पाडाव केल्यावर अनुहृताच्या विजयदुंदुभि वाज- तात व "सर्वत्र तदीक्षण" रूपी एकांतभक्ति उत्पन्न होते (४). गुरुंच्या उपकाराचें उतराई होणें केव्हांही शक्य नाहीं ( ६ ). त्रिवेणीचें नित्यं स्नान करून आत्मारामाचें दर्शन घेतलें असतां "कर्मण्य कर्म" व "अकर्मणि कर्म " सहज होतें (७). देह हीच खरी पंढरी, व आत्मा हाच खरा विठ्ठल (९). निस्त्र्यैगुण्य प्राप्त करून घेण्यास प्रथम सत्त्वाचें सामर्थ्य उत्पन्न झाले पाहिजे. "सत्वेनान्यतमो हन्यात सत्वं सत्वेन चैव हि" (१०). आपण कोणीही तरेल; पण जो दुसऱ्यांस उद्धरील तोच खरा साधु (११). मंगेप्रमाणे आपले मन स्वच्छ झाले असतां भगवंत जवळच उभा आहे. अशा पुरुषांस श्रुतिसंमत अंगुष्ठाप्रमाणें रूप दिसतें; अनुभवी मनुष्यासच ही खूण कळणार. "येरा टकमक " पाहूं लागतो (१३). आत्मस्वरूप हें ज्ञानदृष्टीचें देखणें आहे; चर्मदृष्टी पाहू शकत नाहीं. सत्संगानें प्रारब्धरेषा उगवते, व हरीच्या गुणनामांचा घोष केला असतां पापें जहून जातात (१४). देहभाव विराल्याखेरीज वस्तु प्राप्त होत नाहीं (१५). साधकांनी कल्पनेचें आडरान न घेतां आपण आपल्यास पाहून आनंदांत निमग्न व्हावे ( १६ ). सर्व प्राणिमात्रांवर दया करणें हेंच आत्म-