पान:नित्यनेमावली.pdf/२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१७

बैसोनी निवांत शुद्ध करी चित्त । तया सुखा अंतपार नाहीं ।। १ ।। येऊनि अंतरी राहील गोपाळ | सायासांचें फळ बैसलीया || २ || राम कृष्ण हरी मुकुंद मुरारी । मंत्र हा उच्चारी वेळोवेळा ।। ३ ।। तुका म्हणे ऐसें देईन मी दिव्य । जरी होईल भाव एकविध ॥ ४ ॥ हा महाराजांचा उपदेश हृत्पटलावर सदैव कोरून ठेवण्याजोगा आहे ! एकदा एका गृहस्थांनी महाराजांस म्हटले होतें :- " तुमचें भजन ऐकिले म्हणजे तुमचा मार्ग काय आहे हें ताबड- तोब लक्षांत येतें' याची सत्यता पुढील भजन वाचण्याची जे तसदी घेतील त्यांस कळून येणार आहे. तथापि त्यांतील मुख्य स्थलें दाखविली असतां पुष्कळ लोकांस फायदा होईल असें वाटल्यावरून त्या स्थलांचा थोडा निर्देश करून ही बरीच बाढ- लेली प्रस्तावना पुरी करितों. जसजसा गुरूपदेशाचा अनुभव येईल तसा तसा गुरुपदीं जास्त अभिलाष उत्पन्न होतो ( विषय नं. २ ). अलक्ष्यों लक्ष्य लाविलें असतां निजवस्तु प्रत्ययास येते;