पान:नित्यनेमावली.pdf/२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

स्मृतिपुराणांनीं जी ही आत्मज्ञानाची कल्पना करून दिली आहे ती सद्गुरूस शरण गेल्यानेंच अनुभवास येते. 'सत्वाचें चांदणें 'पहावा दर्पणींचा नयन,' 'पोथी वाचूं जातां पाहे, मातृकांमध्येचि आहे. 'करें घेतां वस्तुलागीं, आडवें ब्रह्म ' इत्यादि वाक्यांचा गुरुकृपे- वांचून बोध होणें अशक्य आहे. सर्व साधुसंतांनीं आत्मज्ञान प्राप्त करून घेण्याकरितां राजयोग व भक्ति यांची विलक्षण सांगड घातली होती. आत्मज्ञान प्राप्त झाल्यावर देव व भक्त यांमधील विभक्तपणा निघून जातो, आपण ब्रह्म आहों अशी खात्री झाल्या वर सर्वाभूत भगवद्भाव दिसूं लागतो हाच सर्व साधुसंतांचा उपदेश आहे. प्रथम आत्मदर्शन कसें होतें व नंतर अभेदबुद्धि कशी होते याचें श्रीज्ञानदेवांनीं उत्कृष्ट निरूपण केले आहे:- - नुसर्धे मुख जैसें । दर्पणीं देखिजतसें दर्शनमिसें । वायांचि देखणें ऐसें । गमों लागे || ज्ञानदेव चक्रपाणी ऐसे | दोन्हीही डोळस आरिसे । परस्परें पाहतां कैसें । मुकले भेदा || --चांगदेवपासष्टी. । धन्य ते साधु कीं ज्यांनी हा अनुभव घेतला आहे ! वरील दोन ओव्यांत ज्ञानदेवमहाराजांनीं सर्व वेद, सर्व शास्त्रे व सर्व पुगणें यांचें सार थोडक्यात सांगितले आहे याचा अनुभव येण्यास साधनें म्हटलों म्हणजे प्रथम गुरुकृपा पाहिजे, व नंतर श्रवण, विचार व अभ्यास हीं पाहिजेत: नंतर विवेकवैराग्य उत्पन्न होऊन