पान:नित्यनेमावली.pdf/२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१४ या उतारावरून इतकें व्यक्त होईल की, या सर्व साधुसंतांनीं आत्मज्ञान हेच आपलें ध्येय केलें होतें. आतां आत्मज्ञान म्हणजे काय? आत्मज्ञान म्हणजे आपण आपल्यास पहाणें. " ऐक ज्ञानाचें लक्षण | ज्ञान म्हणिजे आत्मज्ञान | पाहावें आपणासि आपण या नांव ज्ञान ।” श्रीमद्भगवद्गीतेंतही राजयोगाचें फल आत्मदर्शन हेंच दिलें आहे :- यत्रोपरमते चित्तं निरुद्धं योगसेवया । यत्र चैवात्मनात्मानं पश्यन्नात्मनि तुष्यति ॥ सुखमात्यंतिकं यत्तद् बुद्धिग्राह्यमतींद्रियम् । वेत्ति यत्र न चैवायं स्थितश्चलति तत्त्वतः ॥ - अध्याय ६ गीता. आत्मदर्शन झाल्यावर अतींद्रिय पण बुद्धिग्राह्य सुख होतें; व तें सुख अनुभवीत असतां आसनापासून हलूं नये असे वाटतें असा या गीतावचनाचा सारांश आहे. उपनिषदांतही 'परं ज्योतिरुपसंपद्य स्वेन रूपेण अभिनिष्पद्यते सोऽयमात्मा ' असें वचन आहे. पतंजलींनीं योगाचें फल 'तदा द्रष्टु: स्वरूपेऽवस्थाम्' असेंच दिले आहे. श्रुति-