Jump to content

पान:नित्यनेमावली.pdf/२०३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

नको रे मना द्रव्य ते पूढिलांचे । अती स्वार्थबुद्धी न रे पाप सांचे । घडे भोगणें पाप तें कर्म खोटे । न होतां मनासारिखे दुःख मोठे सदा सर्वदा प्रीति रामीं धरावी दुखाची स्वयें सांडि जीवीं करावी | देहेदुःख हें सूख मानीत जावें । विवेकें सदा स्वस्वरूपीं भरावें ॥ ९ ॥ ॥१०॥