या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१६४
अकॅडमी ऑफ कंपेरेटिव्ह फिलॉसॉफी ॲन्ड रिलीजन
बेळगाव.
बेळगाव.
बेळगांव येथील राणी पार्वतीदेवी कॉलेजला लागूनच सांगलीचे राजेंसाहेब, श्रीमंत चिंतामणराव आप्पासाहेब पटवर्धन यांची खासगी जमीन होती. त्यापैकी कांही भाग कॉलेजचे क्रीडांगणाकरिता मिळावा म्हणून कॉलेजच्या व्यवस्थापक मंडळाने १९४९ साली श्रीमंत राजेसाहेबांच्याकडे विनंती केली. पण या सर्व जमिनीबद्दल कांही तांत्रिक वांधा असल्यानें श्रीमंत राजेसाहेबांनी जमीन आपल्या
मालकीची नाहीं असें कळविलें. याच सुमारास श्री जगन्नाथराव परुळेकर यांची अलिबागहून चिकोडी
विभागाचे प्रांत ऑफिसर म्हणून बदली झाली आणि त्यांचेकडून ही जमीन श्रीमंत राजेसाहेवांच्या खासगी
मालकीची आहे असे कॉलेजच्या चालक मंडळाला कळले. नंतर ही सर्व मंडळी श्रीमंत राजसाहेबांना सांगली येथे