हे पान प्रमाणित केलेले आहे.
१६२
मना कल्पना ते नको विषयांचीं।
विकारे घडे हो जनीं सर्व ची चीं ॥५॥
नको रे मना क्रोध हा खेदकारी ।
नको रे मना काम नाना विकारी |
नको रे मना सर्वदा अंगीकारू ।
नको रे मना मत्सरु दंभ भारू ॥६॥
मना श्रेष्ठ धारिष्ठ जीवीं धरावें ।
मना बोलणें नीच सोसीत जावें ।
स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे ।
मना सर्व लोकांसि रे नीववावे ॥७॥
देहे त्यागितां कीर्ति मागें उरावी ।
मना सज्जना हेचि क्रिया धरावी |
मना चंदनाचे परी त्वां झिजावे ।
परी अंतरी सज्जना नीववावें ॥८॥