पान:नित्यनेमावली.pdf/२०१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मना सज्जना भक्तिपंथेंचि जावे । तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावे । जनीं निंद्य तें सर्व सोडोनि द्यावे । जनीं वंद्य तें सर्व भावे करावें ॥ २॥ 10 प्रभाते मनीं राम चिंतीत जावा | पुढें वैखरी राम आधीं वदावा | सदाचार हा थोर सांडू नये तो । जनी तोचि तो मानवी धन्य होतो ॥ ३ ॥ मना वासना दुष्ट कामा नये रे । मना सर्वथा पापबुद्धि नको रे । मना धर्मता नीति सोडू नको हो । मना अंतरी सार वीचार राहो ॥ ४॥ मना पाप संकल्प सोडूनि द्यावा मना सत्यसंकल्प जींवीं धरावा ल