पान:नित्यनेमावली.pdf/१९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१३ या मुद्याचें विवेचन स्थलसंकोचास्तव येथे जास्त करता येत नाहीं. असो. श्री काडसिद्धांपासून निंबरगीमहाराजांनीं व निंबरगीमहाराजां- पासून भाऊरावमहाराजांनी जे हें आत्मज्ञान मिळविलें तें आहे तरी काय अशी येथें जिज्ञासू वाचकांस शंका येईल. ज्या ज्ञानानें पूर्वी थोर थोर ऋषी पैलपार पावले तें हेच ज्ञान होय । "व्यास वसिष्ठ महामुनि | शुक नारद समाधानी । जनकादिक महाज्ञानी । येणेचि ज्ञानें ॥ २३ || वामदेवादिक योगेश्वर | वाल्मीक अत्रि ऋषेश्वर । शौनकादि अध्यात्मसार । वेदांतमतें ॥ २४ ॥ सन- कादिक मुख्य करूनी । आदिनाथ मीन गोरक्षमुनी । आणीक बोलतां वचनीं । अगाध असती ।। २५ ।। " दासबोध ५-६. अथवा अलीकडील साधुसंतांत, " निवृत्ति ज्ञानेश्वर | नामा आणि कबीर | एकनाथ गोरा कुंभार | कलियुगामाजीं ज्ञान यांसी ।। २४३ ॥ सोपान मुक्ताबाई परमानंद जोगा पाही । भानुदास मिराबाई । रामदास सोई लाग- लासे || २४४ ।। वेणूबाई विसोबा खेचर | तुकोबा नरहरी सोनार । नरसी मेहता रोहिदास चांभार | संत अपार अनुभवी ।। २४५ ।। चहूं युगांमाजी कोणी । जे जे झाले ब्रह्मज्ञानी । ते याची अनुभवें करोनी । सत्य मानी वचमातें ॥ २४६ ॥ दीपरत्नाकर, अध्याय ४.