मानावे । मग सहजचि स्वभावे | कृपाळू देव ॥ २३ ॥
पाहातां देवाचे कृपेसी | मातेची कृपा कायेंसी । माता
वधी बाळकासी । विपत्तिकाळीं ॥ २४ ॥ देवें भक्त
कोण वधिला | कधी देखिला ना ऐकिला | शरणा-
गतांस देव जाला । वज्रपंजरू ॥ २५ ॥ देव भक्तांचा
कैवारी । देव पतितांसि तारी । देव होये साहाकारी ।
अनाथांचा ॥ २६ ॥ देव अनाथांचा कैंपक्षी । नाना
संकटांपासून रक्षी । धांवन्निला अंतरसाक्षी | गजेंद्रां-
कारणें ॥ २७ ॥ देव कृपेचा सागरु । देव करुणेंचा
जळधरु | देवासि भक्तांचा विसरु | पडणार नाहीं
॥ २८ ॥ देव प्रीती राखों जाणे । देवासी करावें
साजणें । जिवलगें आवधीं पिसुणें । कामा न येती
॥ २९ ॥ सख्य देवाचे तुटेना । प्रिती देवाची विटेना |
देव कदा पालटेना । शरणागतांसी ॥ ३० ॥ म्हणोनि
सख्य देवांसी करावें। हितगुज तयांसी सांगावे |
आठवे भक्तीचें जाणावें । लक्षण ऐसे ॥ ३१ ॥ जैसा
पान:नित्यनेमावली.pdf/१९९
Appearance
हे पान प्रमाणित केलेले आहे.
१५९