हे पान प्रमाणित केलेले आहे.
१५८
मनासारिखे न घडे । तेणें गुणें निष्ठा मोडे । तरी
गोष्टी आपणाकडे । सहजचि आली ।। १५ ।। मेघ
चातकावरी वोळेना । तरी चातक पालटेना | चंद्र
वेळेसि उगवेना । तरी चकोर अनन्य ।। १६ ।।
ऐसे असावे सख्यत्व | विवेके धरावे सत्व | भगवंता-
वरील ममत्व | सांडूचि नये ।। १७ ।। सखा मानावा
भगवंत । माता पिता गणगोत । विद्या लक्ष्मी धन
वित्त । सकळ परमात्मा ।। १८ ।। देवावेगळे कोणी
नाहीं । ऐसे बोलती सर्वही । परंतु त्यांची निष्ठा
कांही । तैसीच नसे ||१९|| म्हणोनि ऐसे न करावे |
सख्य तरी खरेंचि करावे। अंतरी सदृढ धरावे ।
परमेश्वरासी ||२०|| आपुलिया मनोगताकारणें ।
देवावरी क्रोधास येणें । ऐसी नव्हेत ही लक्षणें |
सख्यभक्तीचीं ॥२१॥ देवाचें जे मनोगत । तेचि
आपुले उचित । इच्छेसाठीं भगवंत । अंतरूं नये कीं
||२२|| देवाचे इच्छेने वर्तावे | देव करील तें