या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
१५६ ।। श्री राम ।। ।। मागा जालें निरुपण | सातवे भक्तीचें लक्षण | आतां ऐका सावधान | आठवी भवती ॥ १ ॥ देवासी परम सख्य करावे । प्रेमप्रीत ने बांधावे | आठवे भक्तीचें जाणावे | लक्षण ऐसे || २ || देवास जयाची अत्यंत प्रती । आपण वर्तावे तेणें रीती | येणेंकरिता भगवंती | सख्य घडें नेमस्त || ३ || भक्ती भाव आणि भजन । निरूपण आणि कथाकीर्तन । प्रेमळ भक्तांचे गायन | आवडें देवा ॥ ४ ॥ आपण तैसेचि वर्तावे | आपणासि तेंच आवडावे | मनासारखे होता स्वभावे | सख्य घडे नेमस्त || ५ || देवाच्या सख्यत्वाकारणें । आपले सौख्य सोडून देणें । अनन्यभावे जीवे प्राणें । शरीर तेही वेचावे ॥ ६ ॥ सांडुन आपुली संसारव्यथा | करीत जावी देवाची चिंता । निरूपण कीर्तन कथा वार्ता | देवाच्याचि सांगाव्या || ७ || देवाच्या सख्यत्वा ।