Jump to content

पान:नित्यनेमावली.pdf/१९५

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
१५५

उद्धरला । हळहळापासून सुटला | प्रत्यक्ष चंद्रमौळी
॥ २३ ॥ चहुं वर्णा नामधिकार । नामीं नाहीं लहान-
थोर | जड मूढ पैल पार | पावती नामें ॥ २४ ॥ ह्मणोन
नाम अखंड स्मरावें । रूप मनीं आठवावें । तिसरी
भक्ति स्वभावें । निरोपिली ॥ २५ ॥

इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादें
नामस्मरण भक्तिनाम समास तिसरा ॥