Jump to content

पान:नित्यनेमावली.pdf/१९४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१५४ नामाचा महिमा जाणे शंकर। जना उपदेशी विश्वेश्वर | वाराणशी मुक्तिक्षेत्र । रामनामे करुनी ॥ १५ ॥ उकराट्या नामासाठी । वाल्मिक तरला उठाउठीं । भविष्य वदला शतकोटी चरित्र रघुनाथांचे ॥ १६ ॥ 1 . 1 हरिनामें प्रल्हाद तरला । नाना आघातांपासून सुटला । नारायणनामे पावन जाला । अजामेळ ।। १७ ।। नामें पाषाण तरले । असंख्यात भक्त उद्धरले | महापापी तेचि झाले | परम पवित्र ।। १८ ।। परमेश्वराचीं अनंत "नामे । स्मरतां तरिजे नित्यनेमें नामस्मरण करिता येमें। बाधिजेना ।। १९ ।। सहस्र नामामधें कोणीयेक । ह्मणतां होतसे सार्थक नाम स्मरता पुण्यश्लोक | होईजे स्वये || २० || कांहीच न करुनि प्राणी । रामनाम जपे वाणी । तेणे संतुष्ट चक्रपाणी | भक्तालागी सांभाळी ॥ २१ ॥ नाम स्मरे निरंतर । ते जाणावें पुण्यशरीर | महादोषांचे गिरिवर । राम नामें नासती ॥ २२ ॥ अगाध महिमा न वचे वदला । नामें बहुत जन ¡ 1 ● +