आवस्था लागता चटपट | नामस्मरण करावे ॥ ६ ॥
चालतां बोलतां धंदा करितां । खातां जेवितां सुखी
होता । नाना उपभोग भोगितां । नाम विसरों नयें
||७|| संपत्ती अथवा विपत्ती जैसी पडेल काळगती ।
नामस्मरणाची स्थिती । सांडू च नये ॥ ८ ॥ वैभव
सामर्थ्य आणि सत्ता । नाना पदार्थ चाखता । उत्कट
भाग्यश्री भोगिता | नामस्मण सोडु नये । ९ ।। आधी
अवदसा मग दसा । अथवा दसेउपरी अवदसा । प्रसंग
असो भलतासा | परंतु नाम सोडूं नयें ।। १० ।। नामें
संकटे नासतीं । नामें विघ्नें निवारती । नामस्मरणें
पाविजेती उत्तम पदे ॥ ११ ॥ भूत पिशाच्च नाना
छंद | ब्रह्मगिऱ्हो ब्राह्मणसमंध | मंत्रचळ नाना खेद ।
नामनिष्ठे नासती ॥ १२ ॥ नामें विषबाधा हरती नामें
चेडे चेटकें नासती । नामें होय उत्तम गती । अंतकाळीं
|| १३ || बाळपणीं तारुण्यकाळी | कठीणकाळीं वृद्धाप्य-
काळी । सर्वकाळीं अंतःकाळीं । नामस्मरण असावें ॥ १४ ॥
पान:नित्यनेमावली.pdf/१९३
Appearance
हे पान प्रमाणित केलेले आहे.
१५३