Jump to content

पान:नित्यनेमावली.pdf/१८४

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
१४४

जंव अवतार कार्य संपले | समर्थ तंव स्वानंदी बुडाले ।
परी शिष्यवृंदा लोटले | शोक सागरी अपार ।। ६४ ।।
पुढे बांधले अध्यात्मभुवन | कट्टानें चालविले साधन | नित्य
आठ तास नामस्मरण | गुरुआज्ञेनें करीत ते ।। ६५ ।। भुवनीं
असता एक दिन । झालें त्यासी हनुमंतदर्शन | तेज:पूंज तें रूप
जाण । साश्चर्य त्यानी पाहीलें ।। ६६ ।। या अनुभवा-
नंदसवे | देह-व्यथा पुनरपि प्रसवे । नित्यगुरूरायास दुदैवे ।
शीतज्वर ग्रस्त करी ।। ६७ ।। आता सद्गुरूवीण नाहीं
सोय | धरावे त्यांचेच पाय | ऐसा करूनि दृढनिश्चय |
गुरूगृही ते पातले ।। ६८ ।। श्रीबाबा आणि श्रीआक्का |
श्रीसमर्थशिष्या अलौकीका । त्यांचे पावन सानिध्य देखा ।
उत्साहप्रद त्या होई ।। ६९ ।। तेणें त्याचें पारमार्थिक जीवन |
उत्कर्ष पावो लागले जाण | अनुभवही नित्य नूतन | लाभले
त्या गुरूकृपे ।। ७० ।। एकदा 'नयनाचे नयन' देखिले |
आनंदचे भरते आलें । श्रीबाबांना तें कळविलें । त्यांनांही
हर्ष होतसे ।। ७१ ।। पुढे 'नामास नाम' झालें | हेंही