पान:नित्यनेमावली.pdf/१८३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१४३ कृपा कराया विनविले । सर्वभावें तयासी ।। ५५ ।। तात्काळ पावला समर्थप्रसाद । आणि पत्रद्वारें प्रबोध | त्याच्या . मातेनें सेवेनें ब्याधी दुख:द । ओसरली ती हळुहळु || ५६ ॥ नंतर भेटावया समर्थास । मातेसवें गेले इंचगिरीस निवेदिलें दुखा:स || समर्थचरणी तेधवा ॥ ५७ ।। ऐकोनि मातेची आर्त मात | बोलत सद्गुरु कृपावंत । चिंता न करिगे यांत | याची चिंता देव करी ॥ ५८ ।। साठ वर्षे रामरायास मरण भय नाहीं खास | मोठें देवकार्य यास | करावयाचें असतसे' ।। ५९ ।। समर्थाच्या या आशीर्वचने । आनंदली उभयतांचीं मनें । सद्गुरूसन्निधचि राहूनि । साधननिरत ते झाले । ६० || समर्थ मग निरोप निधला । सूचक संदेशही कळविला । अंतःकरणीं उत्तम ठसला | पुढील त्याचा प्रबोध ।। ६१ ।। नेणपणें जालें तें जालें । जालें ते होऊन गेले । जाणपणें वर्तलें । पाहीजें नेमस्त ||६२॥ आतां चांगले दिवस पाहाल | सुगंध वार्ताही ऐकाल । आनंद आनंद होत जाईल | भगवंताच्या कृपाबळे ॥ ६३ ।।