पान:नित्यनेमावली.pdf/१८२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१४२ ३ - । जिज्ञासा आणि सुवृत्ती | कामपूर्ति आणि दुखःनिवृति । उत्कट स्मरण आणि सत्संगति । गुरुकृपा साक्षात्कार ॥४८॥ हीं आठ साधनें जाण । परस्पर पोषणें वाढून ॥ गुरूवर्या चढविती पूर्ण | आत्मदर्शन - शिखरावरी ।। ४९ ॥ परमार्थ- प्राप्ति आणि प्रसार । हेंचि वाटे र्ज वनसार | आदर्श हा परम थोर । पूर्वीपासुन त्या प्रेरितसे ॥ ५० ।। अधि नामसाधन होतें सकाम । तेणें होय पूर्ण काम | वाढलें मग नामप्रेम | उत्कट नेम होतसे ॥ ५१॥ कामप्राप्तीसवें कांही । अनुभवही आले पाही । आश्चर्यानंद ते समई । गुरुवर्याना होतसे ॥ ५२|| तारे बहुरंगी चमकत | शेषांचे वेटोळे दिसत । होत असे अति चकित । नव साधक क्या योगें ॥५३॥ याच समयीं क्षयविकार | बळावलां अति दुर्धर । तेणें मृत्यूचेंही महाद्वार । कांही वेळा त्या दाविलें || ५४ ।। प्रकृतिमान श्रीसमर्था कळविलें | अनन्यभावें शरण गेले ।