Jump to content

पान:नित्यनेमावली.pdf/१८१

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
१४१

वैभव आणि विपत्ती । एकासवे एक येती समतेचे धडे
देती |वेळोवेळीं गुरुवरा ॥ ४० ॥ दोन दुर्धर आजार |
दोनही महाभीकर | लोळविती मृत्युशय्येवर | बहुत दिन
गुरुराया ॥ ४१ ॥ सद्गुरूकृपा प्रबळ | आणि नामनिष्ठाही
सबळ | ओढून काढी त्या कराळ | मुखांतुनीं कालाच्या
॥ ४२ ॥ प्रियजनांचा वियोग | तोही एक दारूण योग ।
दुखा:नळाची ती आग | हृदया त्यांच्या जाळीत ॥ ४३ ॥
आधीं जात प्रियसुत । प्रिय पत्नी पुढे जात । मागती
माताही निघत । परधामा जावया ॥ ४४ ॥ गुरुवर्य एकाकी
जाहले । देवाशींच सख्य वाढविलें । साधननिरत ते झाले ।
उत्कटतेनें ते समयी ॥ ४५ ॥ पुढें समर्थ आज्ञेवरूनी ।
द्वितीय संबंध केला त्यांनी । सत्वरचि कन्यारत्नीं ।
गुरुवर्यानां प्रसादिले ॥ ४६ ॥ असो, तीन तपें शिकवून |
कुलगुरूपद अलंकारून । जागतिक लौकिक संपादुन | सेवा
निवृत ते झाले ॥ ४७ ॥