या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
१३९ वाटावया । कारण कांहीं नसेचि ' ।। २४ | दिव्य भविष्य ऐकोनि सकळां । आनंद अत्यंतच जाहला प्रेमादर त्यांचा दुणावला | रामरायाविषयींचा ॥२५॥ २ पदवीधर झालियावरी। 'फेलो' होऊन सत्वरी | छात्रवर्गा बंधूदरी प्रेमळपणें वागवी ॥ २६॥ शेवटीं आचार्य 1. परीक्षेत | तत्वज्ञान विषय घेत । पहिला क्रमांक मिळवित | कुलपति सुवर्णपदकही ॥२७॥ परीक्षितांचे विषयज्ञान | अधिक असें परीक्षकाहून परीक्षकांची ही प्रशस्ती मिळवून धन्य धन्य ते जाहले ॥ २८ ॥ पुढे जाहले अध्यापक | मग होत प्राध्यापक नंतर ज्ञान शाखा प्रमुख । शेवटी होत कुलगुरू || २९ ।। एवं चढती वा ती पायरी | गुरुकृपे लाभे उत्तरोत्तरी । ऐंहिक वैभावाच्या शिखरीं विराजत आपुल्या बुद्धीबळें ॥ ३० ।। अध्ययनें बुद्धी फुलली । नामसाधनें प्रतिभा फांकली | अंतर्बाह्य पूर्णता लाभली