त्यावरी निर्वाह तयाचा ||३७|| दोहोचें ते तीन झाले तिन्हीं
जागीं सहा पातले । तव एक पोतें बाबानीं दिलें । निंबरगीं
सप्ताहानिमित्त ॥ ३८ ॥ हें पाहोनी समर्थ तोषले
बलूतेदार त्वां मज केले । ऐसें म्हणोनि आशिर्वांदिले ।
'ओक्कळि गोम्न' द्यावें बा ॥ ३९ ॥ अंकुरला जो भाव
अमोलिक । आतां यांतचि अमित पीक | देईल तुज जग-
नायक | आशीर्वचन हे सद्गुरूंचें ॥ ४० ।। सहाचे मग
बारा होत बारांचें बावीस जमत | पुढे छत्तीसही
येत । उणें काय देव देतां ॥४१॥ अनंत हस्तें देतां देवें ।
दोहातीं ते किती घ्यावे | चालवी योगक्षेम तोचि सवें |
चिंता करणें कासया ॥४२॥ बाबांनी धंदा सोडिला ।
केवळ परमार्थ वाढविला । अमित नामप्रेंमा जोडला |
सेविला सद्गुरुनिष्ठेने || ४३ || चित्तीं ज्याच्या बसें नाम |
करील काय तया काम | परी या मायिकाचा नेम | प्राणां-
तींही न धरवे॥ ४४॥ वैराग्य आणि यौवन | समरस होणे
अति कठिण | महद्भाग्ये हें लाभें जाण | सद्गुरुकृपें
पान:नित्यनेमावली.pdf/१६९
Appearance
हे पान प्रमाणित केलेले आहे.
१३१