गुरुदेव । नाम देण्याकारणें ॥२९ || दिव्यनाम पडतां
श्रवणीं । वृत्ति पालटली तत्क्षणीं । नासाग्रीं दृष्टी ठेऊनी ।
बाबा निघाले नेंम करीत ॥ ३० ॥ इंचगिरीस बाबा येत ।
परि नासाग्री दृष्टी अविचलित यापरी सतत नेमांत ।
एक मास लोटला ||३१|| झाली नेत्रव्यथा भीकर | तेजरूप
दिसतीं अपार । भ्रांत होय साधकवर | घात झालासे
म्हणोनिया ||३२|| सावळसंग ग्रामी पातलें| गुरुसी
इतिवृत्त निवेदिलें । म्हणे मज गरीबाचे डोळे । गेले आता
काय करूं || ३३ ॥ गुरूराय हसती तेधवां। जमवून
शिष्यांचा मेळावा | सांगोति नवशिष्याच्या अनुभवा ।
अनुभवपदें म्हणविती ||३४|| प्रात:काळी नेमा त्वरित ।
बाबा जात डोंगरांत | माध्यान्ह उलटता परतोन येत । ऐंसे
निष्ठुर तप केलें ||३५|| अखंड साधने सिद्धि मिळवी ।
संसारचिंता सुदूर पळवी | भक्तियोगाचा मार्ग मळवी ।
मिळवी प्रेम सद्गुरूंचे || ३६ | तव शेत एक लिलावांत
घेतलें तें भाचा त्यास देत | दोन पोती धान्य त्यांत ।
पान:नित्यनेमावली.pdf/१६८
Appearance
हे पान प्रमाणित केलेले आहे.
१३०