पान:नित्यनेमावली.pdf/१६२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१२६ श्री समर्थ अंबुराव महाराज यांचे संक्षिप्त चरित्र. सहावा समास ॐ नमो सद्गुरूवरा । आत्मतेज प्रभाकरा । सुमन मम विकसित करा आत्मदेवा ॥ १ ॥ श्रीसमर्थ भाऊराव | अमित त्यांचा शिष्यसमुदाव। विराजत त्यांत अंबुराव । उड्डुगणीं जेवि चंद्रमा ॥ २ ॥ वेष असत तो बावळा | परि अंतरीं अध्यात्मकळा | भक्तिभावाचा जिव्हाळा ॥ विलक्षणचि वसतसे || ३ || जयास सद्गुरू हाचि देव । सद्गुरूपदीं दृढतम भाव | सद्गुरुसि समर्पनी सर्वं । अनन्यपणें राहात ॥ ४ ॥ मति जयाची अतिप्रखर । नीतिनेमही खडतर । ।