निरूपिजेल ||८८ | आत्मा द्रष्टव्य म्हणुन एक । श्रोतव्य
नाम दुझे देख । मंतव्य तिसरे चौथें आणिक ।
निदिध्यासितव्य |। ८९ ।। आत्मा द्रष्टव्य आत्मा
पाहाणें । आत्मा श्रोतव्य श्रवण करणें | मंतव्य
म्हणिजे मनीं विचारणें । सर्व कांहीं ॥ ९० ॥ निदिध्या-
सितव्य म्हणजे ध्यानीं | रूप अभ्यासें प्रगटें नयनीं ।
मग ते जनीं आणि मनीं । सर्वदा दिसें ॥ ९१ ।। ध्यान
करुन रूप पाहाणें । उगमा जातां जन्म नेणें । ऐशी
आशा धरुन राहाणें । मनामध्ये ॥ ९२ ।। श्लोक ।।
नभासारखे रूप या राघवाचें । मनीं चिंतितां मूळ
तुटे भवाचें ॥ याहून सुलभ कबीरवचन | मुढा वाटे
तेंहि गहन । श्रोतीं वाचावें देऊन मन । पुढें आहे ।। ९३ ।।
वचन || देखो तो खसखस मूरीद मरे तो बसबस
|| १ | ऐंसेचि एक कानडींत । तेही दिधलें आहे येथ ।
सुलभ जाणा अतिशयित । साधकांसी ।। ९४ ।।
वाक्य || कुरहुर्कडरे मरळि भववके बरलारि ।। १ ।।