हे पान प्रमाणित केलेले आहे.
१२१
याचि देहीं याचि डोळा | घ्यावा मुक्तिचा सोहळा |
स्वरूप न पाहतां बावळा । नामधारक होय ॥ ७३ ।।
आपणां नको साधन । नाममात्रें मुक्त झालों जाण ।
ऐसे मनी दृढ धरुन | साधन चुकविती ॥ ७४ ॥
प्रपंचभीति उडेना । काम क्रोधासि जिंकवेना ।
अनिर्वाच्य आनंद सापडेना | साधनावाचुनीं ।। ७५ ।।
साधन नसतां विषयजाळीं | नामधारक सांपडे
तात्काळीं । अभ्यासें खणून वासनामुळी । ह्मणून
काढावी ॥ ७६ ॥ जो नामधारक आचार भ्रष्ट | तो
समजावा योगभ्रष्ट । गुरूवचन सांगतो स्पष्ट | मुक्तीस
न पावे ॥ ७७ ॥ गुरूसी पुनःशरण रिघावे | तरीच
त्याने मुक्तीस जावे। गुरू नसता लागें यावे । पुनः
संसारासी ॥ ७८ ॥ योगभ्रष्ट जन्म पावती । मानव-
कुळी जन्म घेतीं | परी लक्ष चौऱ्यांशीची गती । चुकोन
जाते ॥ ७९ ॥ मानव जाहल्यावरी । ज्ञानमार्ग
सांपडे झडकरी | प्रयत्न होताची करीं । मोक्ष येतो