पान:नित्यनेमावली.pdf/१५६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१२० हंसा आणि परमहंमा । एकचि पदवी दोघां पुरुषां । किंचित् भेद तोही सहसा | न समजे ।। ६६ ।। आता मुक्तिचें लक्ष्मण । विशद दावुं बोलून | तेंचि मांता सावधान । श्रोती परिसावें ॥ ६७ ॥ गुरूवांचुन नाहीं मुक्ती । ऐसें सांगितले सिद्धांती आतां नामधारकांची स्थिती | बोलीजेल ॥ ३८ ॥ नामधारक आणि नेमस्त | गुरुवचनीं विश्वास धरीत । आचार बळें शोभत । अंती मुक्त होय ॥ ६९ || वासनाक्षय ह्मणजे मुक्ती । ऐसे सर्वत्र म्हणती । परी ऐशिया नामधारकाची गति । वेगळीच असे ।। ७० ।। दा० बो० || जेचि क्षणी अनुग्रह झाला | तेचि क्षणीं मोक्ष झाला | बंधन कांही आत्म्याला । बोलोंचि नये ॥ १ ॥ अभ्यासें घेती आत्मदर्शन | मी आत्मा अनुभवती पूर्ण विश्व ब्रम्ह जाणती जाण । ते जीवन्मुक्त होती ॥ ७१ ।। अंती मुक्ति आणि जीवन्मुक्ति । यात महदंतर निश्चितीं । म्हणून अभ्यासे स्वरूपस्थिती । अनुभवावी ॥ ७२ ।।