पान:नित्यनेमावली.pdf/१५५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

1 सर्वदा असे ।। ५७ ॥ 'मही' म्हणजे भूमीवरी । त्रिगुणा भिऊनि चाले अंतरीं । तई महिमा चढल्या- वरी । ज्ञानदेवचि तो ।। ५८ || दृष्टापुढे 'ज्ञान पाहिले । तै साक्षात् 'देव' चि झाले | ह्मणून ज्ञानदेव ह्मणितले । पृथ्वीवरी ।। ५९ ।। ऐसे समर्थ ज्ञानदेव झाले । गुह्य तेची प्रगटविले | सर्व विश्व ब्रह्म केले । धन्य धन्य साधु ।। ६० ।। आता हंस परमहंस यांचे । लक्षग करितों उभयतांचें । एकाग्रमनें ऐका साचे । श्रोते जन ।। ६१ ।। हंस लक्षण प्रपंचात । हौस धरुनि सहत । प्रपंचीं परमार्थ करीत । आणि अंतरीं मुक्त ।। ६२ ।। प्रवृत्ति मार्ग स्वीकारिती आणि समुदाय वाढविती । मुक्त होऊनि मुक्त करिती । साधकजनां ।। ६३ ।। हंस राहे ससारीं । परी भार ठेवी देवावरीं । जैसा वाळ खेळे अधांतरीं । ताताधरे ॥ ६४ ॥ परमहंस केवल परमार्थी | अनन्यांसि उपदेशिती । निवृत्तिमार्ग स्वीकारिती । प्रवृती सांडुनि । ६५ ।। + }