Jump to content

पान:नित्यनेमावली.pdf/१४९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
११३

बोजा । आत्म्यापरी ठेऊन ओजा । साधकां करीती
सहजा । आपणासारिखे ॥ १४ ॥ अथवा बुध मुमुक्षु
मंडळी । येऊन मिळती तयांजवळी । तयांसहीं तात्कांळीं ।
करिती साधु ॥ १५ ।। अभंग || आपणासारिखें
करिती तात्काळ । नाहीं काळवेळ तयांलागीं ॥ १ ॥
ऐंसी युक्ति चालली पाही । जी वर्णितां यें ऐसी
नाहीं । दासबोधीं कथिला तोही । दृष्टांत ऐका ।। १६ ।।
दा. बो. द. १५ स. २ ओवी || २३ || खनाळामध्ये
जाऊन राहे । तेथे कोणीच न पाहे सर्वत्रांची चिंता
वाहे । सर्वकाळ || १ || खनाळामध्ये राहून । सभा
थाटे चालविती पूर्ण |लोकां प्रचित दाखवून | भक्ति
वाढविली ।। १७ ॥ प्रचीत म्हणजे आत्मप्रचीतीं ।
गुरुप्रचीति शास्त्रप्रचीती । प्रत्येक गोष्टीची प्रचीति ।
साक्षात्कारें ।। १८ । साक्षात्कार म्हणजे अक्षात ।
साहा गुणांचा पालट होत | तई जनांत प्रख्यात |
होइजेल ॥ १९ ॥ षड्गुण कैसे पालटावे | कामें