हे पान प्रमाणित केलेले आहे.
११२
बडबड साची | आयुष्य गेले व्यर्थचि । मायाजाळी
।। ५ ।। मनीं कामना धरुन | भक्ति करिती सकळ जन |
तैसेची मीही अजाण | करीतसे ।। ६ ।। निष्कामत्व
मोक्षप्राप्ती | सकामत्वे जन्मप्राप्ती । म्हणून निष्काम
कैसी भक्ति । निरुपिजेल ।। ७ ।। निष्काम म्हणजे
कामनेवीण । शिवाशीं जीव भेटून | जै शिवांतचि
होई लीन | तै सुटका ।। ८ ।। सुटल्यावरी देव होत ।
जग सगळे उद्धरीत । जगीं सांभसमान शोभत |
शाश्वतरूपे ।। ९ ।। सा म्हणिजे 'साहा' गुण । 'भ'
म्हणिजे भविष्य जाण । तोडून रेषा फिरवून | घेतली
पहा ।। १० ।। रेषा फिरण्यास मुख्य कारण | एकनिष्ठ
भक्ति जाण | तया भक्तिचे निरसन | सावध ऐका
।। ११ ।। 'भ' म्हणती भविष्यास । 'ती' म्हणती
हरिमायेस | हरिमायेंनें शेवटास | होणार नेलें ।। १२ ।।
भविष्याच्या शेवट करुन | प्रपंच परमार्थ दोहोंतून
मीकाढूपणातें | पार तरले ।। १३ ।। या दोहोंमध्यें