Jump to content

पान:नित्यनेमावली.pdf/१४५

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
१०९

उदार भाविक आणि उपकाराविषयीं । सर्वात श्रेष्ठ
॥ ४० ॥ सोलापुरी भक्त वाढविती । तेणें समर्थांची
वाढे ख्याती। नाना लोकास साधनस्थिती | सहजचि
प्राप्त होतसे ॥ ४१ ॥ शिष्यांमध्यें ज्ञानी परम ।
वेदांताचें पूर्ण धाम | नाना विद्या जया सुगम |
एकसरें ॥ ४२ ॥ वकील विजापुरीं नरहरराव त्यांस
सांपडे भक्ति-ठाव | संपादू इच्छिती आत्मज्ञान नांव |
खटपट करिती ॥ ४३ ॥ ज्ञानी बहुत असून भक्ति
चालविती प्रेमेंकरून | धन्य तयाचे महिमान | मी
काय वर्णू ॥ ४४ ॥ कित्येक असती शब्द ज्ञानी ते न
होती आत्मज्ञानी । परी हे शब्दज्ञान वारुनी खटपट
करिती ॥ ४५ ॥ तेरदाळीं जेठमल्ल | भक्तिसामर्थ्य
जाहले मल्ल । औदार्यांविषयी त्यासी तुल्य | कोणीच
नसे ॥ ४६ ॥ त्यांनीं आत्मज्ञान अनुभविलें ।
स्वजनांसि भक्तीस लाविले । तेणें बहुत ख्याती पावले ।
समर्थ तेथ ॥ ४७ ॥ सर्व समासांचा सारांश | द्यावया