हे पान प्रमाणित केलेले आहे.
१०८
असतां लहान । तेव्हांचि अनुग्रह झाला जाण ।
तयें वेळेपासून साधन । नित्य करीतसे ॥ ३२ ॥ इराप्पा
नामें बालक | असे अति भाविक | भजनीं निष्णांत
सात्विक | सर्वाहून ॥ ३३ ॥ एकदां भजन आइके
जरी । न विसरे प्राणांतवरी | नासिकाग्रदृष्टी ठेऊन
करी । कामकाज ॥ ३४ ॥ इतकें लहान बालक । कैसे
झालें अति भाविक | हेंचि वाटे कौतुक । सकल
जनां ॥ ३५ ॥ येणेंपरी अनंत लोक । स्त्रियाहि
आत्मज्ञानिक | धन्य तयाचे कौतुक । वर्णवेना |
॥ ३६ ॥ आईसाहेब पटवर्धन | समर्थ कीर्ति ऐकोन |
अनुग्रहीत होऊन | भक्ति औत्सुक्ये करिताती ॥ ३७ ॥
अंतरीं बाणिलें आत्मज्ञान | भक्तीवरी अति मन ।
धन्य तयांचें महिमान । किती वर्णू ॥ ३८ ॥ जमखंडी
ग्रामी लोकांस । बहुतांसि लाविले भजनास । नेला
जन्म सार्थकतेस | हिंचगेरी मठ बांधोनि ॥ ३९ ॥
सोलापुरीं बयाबाई | भक्ति थाटें चालविती पाही ।