Jump to content

पान:नित्यनेमावली.pdf/१४३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१०७

मानूनि त्यास त्रिकाळीं । गुरू भाविती वंदिती भाळी ।
प्रेंमें करूनि ॥ २४ ॥ तैसेचि तिकोटेकर रामराव |
ज्यासी संसार झाला वाव | त्यांचा समर्थे देखोनी
भाव | सदैव आपणापाशीं ठेविले ॥ २५ ॥ जयाचें
उपनाव फडणवीस | बाल ब्रह्मचारी पुरुष । उदार
विरक्त आणि तापस | गुर्वाज्ञेसी तत्पर ॥ २६ ॥ त्याच
ग्रामीं आणखी एक असती एक भाविक | कवित्वे
करिती अनेक | गंगाबाई ।। २७ ।। याही भक्तीच्या
भुकेल्या | साधनीं सदोदित रंगल्या । आत्मज्ञानीं
निष्णात झाल्या | विश्वासबळें ॥ २८ ॥ निंबरगींत
असती परमभक्त । नागाप्पा नामें विख्यात | वाद्य
गायनीं निष्णात । गंधर्वा ऐसे ॥ २९ ॥ निंबरगींत
महाराजांचे पौत्र | समर्थांसवे हिंडती सर्वत्र | गुणवंत
आणि पवित्र । सर्वामध्यें ||३०|| तैसाचि समर्थाचा
एक सेवक । आठ वर्षाचा बालक । लिहितां वाचता
कांहीं एक | येत नाहीं ।। ३१ ॥ पांच वर्षाचा