Jump to content

पान:नित्यनेमावली.pdf/१४१

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
१०५

संभावित आणि सात्विक | भक्तिवान आणि भाविक ।
सर्वोत्तम ॥ ८॥ समर्थे पाहून त्यांचे गुण ।
उपदेशावया अधिकार पूर्ण । दिधला परंतु कोणीही
जन। नुपदेशिले ॥ ९ ॥ त्यांनी सांगितले समर्थास ।
मी आपला दासानुदास । आपण असतां उपदेशास ।
केंवीं अधिकारी होईन ।। १० ।। जैसी रामदासांची
शिष्यीण । वेणूअक्का नामें सुजाण । तैसीच समर्थाची
पूर्ण । शिवलिंगव्वा नामें ।। ११ ॥ तयांचे स्थळ
जत संस्थान । लहानपणी उपदेश घेऊन । भक्ति
करिती तेव्हापासुन । एकनिष्ठपणें ॥ १२ ॥ सदोदित
करिती साधन । दृष्टीपुढें आत्मज्ञान | धन्य तयांचें
महिमान | मज न वर्णवे ।। १३ ।। महाराजांचे खटपटी
भक्त । नंद्याप्पा आणि तुकाराम विरक्त । दोघे भावे
वर्तत || एकनिष्ठपणें || १४ || नंद्याप्पाचे निवासस्थान |
जमखंडी नामें संस्थान | अनुगृहीत होऊन बहुत
दिन जाहले ।। १५ ।। लिंगायत कुळीं जन्म