या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
१०४ श्रीगणेशा नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥ श्रीराम समर्थ ॥ जयजयजी उमदीकरा | सकल सद्गुण माहेरा | चरित्र कथावया आज्ञा करा | ब्रह्मानंदा || १ || आज्ञा आपुली शिरसा वंद्य | आपण असा जगद्वंद्य । मर्नी स्मरोनी तुमचे पाद | कथा आरंभी मी ॥ २ ॥ तुम्ही निर्गुण निराकार | प्रपंचीं दिसतां साकार । आपणां न लगें संसार । म्हणोनि संसारांतीत | ॥ ३ ॥ महाराजांचे अनेक भक्त । परी कोण कोण झाले विरक्त | त्यांची कथा मन सुचित | समर्थ ऐका ॥ ४ ॥ जैसे रामदासशिष्य कल्याण तैसेचि असती गुणसंपन्न । अंबुराव नामें सुजण । करोनी भक्त ॥ ५ ॥ कल्याण उपमेसी दिधले ।। त्यांनी बहुत साधन केलें । सावनें मुख्य शिष्य झाले | म्हणून साम्य ॥ ६ ॥ हिचगेरी क्षेत्रीं । जाण । मठ | बांधावया दिवले स्थान मठामध्यें स्थळ करुन । । भक्ति करीत राहीले ॥ ७ ॥ असती अति साधनिक | -