Jump to content

पान:नित्यनेमावली.pdf/१३९

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
१०३

वर्णावा ।। २९ ।। असो मी मतिमंद अज्ञान
पुढील समासीं निरूपण |शिष्यवर्गाचे करीन ।
श्रोती सावध परिसावें ॥ ३० ॥ माझें लिहिणें
साकार | समर्थ असती निराकार । साकार लिहितां
चुकें फार | तरी क्षमा मज किजे ॥ ३१ ॥ हें माझें
चुकिचें लिहिणें । श्रोतीं गोड मानूनि घेणें । मज दीना
न अव्हेरणें । क्षमा करोनि ॥ ३२ ॥ मी महाराष्ट्र भाषीं
अजाण । अर्थव्याकरणीं बुद्धीहीन | म्हणून वर्णन संपूर्ण
करितां नये || ३३ ।। मी असे अजाण करंटा | उगाच
ओव्यांचा करी पुरवठा । म्हणून हे गुरुश्रेष्ठा । क्षमा
केली पाहीजे ॥ ३४ ॥ असो धन्य धन्य हिचगेरीं क्षेत्र |
तेथें जाती ते पवित्र । स्वयें दर्शनें करिती पवित्र ।
इतर जनांसीं ॥ ३५ ॥ इति श्रीहिंचगेरीवर्णनं नाम
तृतीयः समासः ||


● ✮ ●