पान:नित्यनेमावली.pdf/१३८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१०२ ठेऊन ! असती पूर्ण । सर्वकाळीं ॥ २१ ॥ गुरूंच्या पादुका गुरूलिंगजंगम म्हणून भक्ती चालविती नमून | तया पुढें || २२ शिवलिंगाजवळी गणपतीची ॥ आणि मूर्ती असे बलभीमाची । तेणें शोभा दुणावे साची | मूळ मूर्तीची ॥ २३ ॥ चौघडा वाजे समोर । स्त्रिया बसती माडीवर | घंटा टांगिली असे थोर । नादें अंबर भरतसे ॥ २४ ॥ पालखी निघे तीन रात्री । तयापुढें वाजती वाजंत्री । वाटे कंपायमान धरित्री । नामघोषें ॥ २५ ॥ गुरुलिंग मूर्ति पालखींत । बैसवुनी बारा अभंग म्हणत | नानापरीचीं वाद्ये वाजत | नाना छंदे ॥ २६ ॥ पालखीपुढे नाचती कितीएक गुरुलिंगजंगम नामें गर्जती । । करिती । ।। २७ ।। पांच प्रदक्षिणा घालिती । मग मूर्ती पूर्वस्थळी ठेविती । नानापरी आरत्या करिती । महानंदे ।। २८ ।। अन्नसंतर्पण सात दिवस । करोनि भक्त जाती स्वस्थळांस | तथा सप्त्यांचा उल्हास । किती म्हणून भजन जयजयकारें