पान:नित्यनेमावली.pdf/१३६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१००

करणी | मठ बांधिला वनीं । तेथील वर्णन निरुपणीं । सावध ऐका ॥ ४ ॥ योगीराज महासमर्थं । कष्ट करुनि पाहीला परमार्थ । परमार्थ तोचि मुख्य अर्थ दृष्टीपुढे ॥ ४ || ॥ जिकडे जातील समर्थ । त्या स्थळीं सर्वहि अर्थ । अर्थ असता अनर्थ | कासया घडे ॥ ५ ॥ एकीं मागमागोन घेणें । एकां न मागता देणें निष्क्रमभजनें देव उणें । पडोंचि नेदि ॥ ६ ॥ समर्थ जिकडे जाती | तिकडे लोक धावून येती । आलेल्यांचे मन करीती । संतुष्ट बहु ||७|| बहु दूर भक्ति पसरली । हिंचगॅरीस येती भक्त मंडळी | सप्ता करोती योग्यकाळीं " आनंदाने ॥ ८ ॥ मार्गशीर्ष चैत्र माघ मासीं । उत्सव करिती सप्त्यांसी । श्रावणमासीं निश्चयेंसी | साधन वाढविती ।। ९ ।। तया स्थळीं चमत्कार | होती तयांचा विचार | शोधुन पहावा साचार | विचारवंतीं ।। १० । विचार म्हणजे इच्छ हार । न मागता होत साचार | नाना अडचणींचा प्रकार | निघोन जातो ।। ११ ।। तया स्थलांचे मोल । करितां होतसे अमोल | रत्न आणि