या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
अनिर्वाच्य सुख प्राप्त झालें । साधन पंथे । ७४ ।। असो तया साधूंची लक्षणें । लिहिता होत असे उणें । मी मतिमंद काय जाणे । नाना कळा ॥ ७५ ।। समर्थाचे वर्णन | मी काय करीन दीन । अनुगृहीत मी म्हणून | एवढें वर्णिलें ।। ७६ || होईल कृपा जरी सत्वर | पुढतीं लिहोंन साचार | नातरी मी पामर । इतुकें पुरें ।। ७७ ।। श्रीमत्समर्थ भाऊराव महाराजचरित्रनिरूपणं । इति नाम द्वितीय समास : ॥
॥ श्रीगणेशाय नमः || श्रीगुरुभ्यो नमः ॥ श्रीराम समर्थं || जें कां सप्रेम भक्तिचें फळ । कीं सरळ वैराग्याचें मूळ । अथवा ज्ञानाचें अधिष्ठान केवळ । ते हे प्रांजळ सत्कथा ॥ १ ॥ संसारतप्त भक्त प्रेमळ । आनंदसागरी जाहले शीतळ त्यांची चरित्रें अति रसाळ | ऐकिली सकळ सज्जनीं ॥ २ ॥ धन्य तयांची