हे पान प्रमाणित केलेले आहे.
९८
कित्येक बाधा घालविती । संकटी उपाय सांगती ।
व्याधिग्रस्तांस बरे नामौषधें ।। ६७ ।।
त्रिकाळ पुराण भजन साधन । कदापि न चुकविती
जाण । आनंदसागरीं आपण मग्न । वारंवार होती
॥ ६८ || कित्येंक श्रोतेजन येती । ते पुराण भजनचि
ऐकती । परी त्यांसीं न कळे साधनस्थिती । नाम-
धारकांऐसी ॥ ६९ ॥ पुराण भजन म्हणजे शब्दज्ञान |
साधन म्हणजे निःशब्दज्ञान | वरिवरी पाहतां
निःशब्दज्ञान | केंवी कळें ॥ ७० ॥ आपण महंती न
करिती । परी सर्वत्र चमत्कार होती । कां तें
पुण्यमार्गे चालती । म्हणोनिया ।। ७१ ।। ज्ञानास
सिद्धींचा विटाळ । ऐसें वदती वेळोवेळ । परी तो
गोविंद कृपाळ । भक्तकाज करीतसे ।। ७२ । साधनें
साध्य झालें सर्व । तथापि करिती साधन उपाव | कीं
साधकां यावा उत्साह | साधन करवाया ।। ७३ ।।
संदेहासि जिंकिले | आणि भयासि पळविलें ।